वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

लाडक्या बहिणींना ३० जून पासून हफ्ता मिळायला सुरुवात होणार ; अजित पवारांनी सांगितली गुड न्यूज

लाडक्या बहिणी फार आतुरतेने आपल्या जून महिन्याचा हफ्ता खात्यात जमा होण्याची फार आतुरतेने वाट बघत आहे. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जून महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना कधी मिळणार ? कधी खात्यात पैसे जमा होणार ? या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यातील पात्र महिलांना पुढील हफ्ता मिळण्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. 30 जून 2025 पासून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळायला सुरुवात होणार असा अंदाज आहे. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मागच्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. ही योजना पहिले मध्य प्रदेश सरकारने सुरु केली होती. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात.  जुलै २०२४ या योजनेचा लाभ देण्यात येतोय.

Sisters will receving money 30 June 2025

आतापर्यंत एक वर्षांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण ११ हफ्ते जमा करण्यात आले आहे. आता महिला १२ वा हफ्ता खात्यात येण्याची वाट बघत आहे. 29 जून 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या बहि‍णींना दिल्या जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी असे सांगितले की, राज्य सरकारने नुकतेच एकूण 3 हजार 600 कोटी रुपये डीबीटी खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. यामुळे आजपासून म्हणजेच 30 जून 2025 पासून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळायला सुरुवात होणार असा अंदाज आहे.

जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता. जून महिन्याच्या हफ्त्याला उशीर होत असल्याने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत दिले जातील असे म्हटले जात होते. विशेष बाब अशी की आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील असाही दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मात्र आज पासून म्हणजे 30 जून पासून जून महिन्याचा पैसा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे जुलै महिन्याचा लाभ हा पुढील जुलै महिन्यातच मिळणार आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

DBSKKV FEP शिरगाव, जि. रत्नागिरी – अध्यापन सहाय्यक (मत्स्य अभियांत्रिकी) पदभरती जाहीर

DBSKKV FEP Shirgaon Job 2026 - Principal/Associate Dean, Fisheries Engineering Polytechnic, Shirgaon, Dist. Ratnagiri invites......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *