वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सिसिटीव्ही साठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये सिसिटीव्ही कॅमेरासाठी ४ कोटी मंजूर करण्यात आलेले आहे. अशी नवीन बातमी प्रकाशित झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या या प्रस्तावाला आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार , असं प्रश्न होता. जिल्हा परिषदेच्या १ ,५१२ शाळा आहेत. ज्या शाळांची पटसंख्या शंभरपेक्षा अधिक आहे, अशा ४५० शाळांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी ४  कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

CCTV in ZP School 2026

मागीलवर्षी पालघर-ठाणेच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा परिषद शाळांत सीसीटीव्ही लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला होता. जिल्हा परिषदेने तो तडकाफडकी तयार केला. मात्र, निधीअभावी प्रस्ताव लांबला होता. आता डीपीसीने ४ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीतून या सीसीटीव्हींना मंजुरी दिली आहे. शिक्षण विभागाने हा प्रस्ताव स्पेसिफिकेशनसाठी व्हीएनआयटीला पाठविला आहे. त्यांची मंजुरी आल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

४५० शाळांसाठीचा प्रस्ताव मागील दहा महिन्यांपासून प्रशासकीय प्रक्रियेत अडकला होता. प्रशासनाने तो प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पुणे कार्यालयाला पाठविला. त्यानंतर काही स्थानिक मंजुऱ्या घेण्यात आल्या. आता प्रस्ताव स्पेशिफिकेशनसाठी व्हीएनआयटी या संस्थेकडे पाठविण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रस्तावाला आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न होता. जिल्हा परिषदेच्या १,५१२ शाळा आहेत. ज्या शाळांची पटसंख्या शंभरपेक्षा अधिक आहे, अशा ४५० शाळांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वेळेपर्यंत काही अतिरिक्त शाळांचा समावेश होण्याची शक्यता आहे. ४ कोटी ७लाख रुपयांची तरतूद या प्रकल्पावर करण्यात आली आहे. या प्रस्तावाची फाइल तांत्रिक मान्यतेसाठी पुण्याला पाठविण्यात आली होती. शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी हे सीसीटीव्ही लागतील, असे अपेक्षित होते. मात्र, निधीअभावी प्रस्ताव लांबत गेला. मागीलवर्षी ठाणे-पालघर येथे इंग्रजी शाळेत कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर प्रशासन जागे झाले. राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. शिक्षण विभागाने तडकाफडकी प्रत्येक शाळांचा आढावा घेतला. तत्कालीन शिक्षण समितीने प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेत प्रस्ताव तयार केला होता.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *