MPSC Recruitment for 758 posts 2026 : A new advertisement has been published by Maharashtra Public Service Commission (MPSC) for the recruitment of 758 vacancies of Group ‘B’ posts. Applications for this recruitment have to be made online. MPSC Recruitment for 758 posts 2026 The application process has started from 8 April 2026. The last date for applying is 22 April 2026. Know the necessary information regarding this recruitment. Know the names of the posts, number of posts, educational qualifications etc. as follows.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट ‘ब ‘ पदाच्या ७५८ रिक्त जागेच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ८ एप्रिल २०२६ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल २०२६ ही आहे. या भरती संदर्भातील आवश्यक माहिती जाणून घ्या. पदांची नावे , पदांची संख्या , शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती खालीलप्रमाणे जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

तरुणांसाठी मोठी संधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे . या भरती अंतर्गत ७५८ रिक्तपदे भरण्यात येणार आहे , इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात . स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
तसेच या भरती प्रक्रियेसाठी ८ एप्रिलपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २२ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. MPSC मार्फत विविध पदांची भरती होणार आहे . प्रत्येक पदांसाठी रिक्त जागेची संख्या , शैक्षणिक पात्रता , परीक्षा शुल्क तसेच इतर अटी बद्दल माहिती दिलेली आहे.
MPSC भरती ची आवश्यक माहीती :
पदे आणि पदांची संख्या : या भरती मोहिमेअंतर्गत सहायक कक्ष अधिकारी-०३ पदे, राज्य कर निरीक्षक-२७९ पदे, पोलीस उपनिरीक्षक ३९२ पदे, तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-१) मुद्रांक निरीक्षक या गट-ब ८४ पदांचा समावेश आहे.
पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असून, साधारणपणे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता : काही पदांसाठी विशिष्ट शारीरिक पात्रताही लागू असू शकते,
इतर अटी : विशेषतः पोलीस उपनिरीक्षक पदासाठी. तसेच उमेदवारांचे वय, आरक्षणनिहाय सवलती आणि इतर अटी आयोगाच्या अधिसूचनेनुसार लागू राहतील.
परीक्षा शुल्क खुला प्रवर्गातील उमेदवारांना ५४४ रुपये परीक्षा शुल्क भरावा लागेल तर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३४४ रुपये अर्ज शुल्क भरायचा असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळविण्यात आले आहे.
एमपीएससी मार्फत होणारी ही भरती महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सूचना नीट विचारपूर्वक वाचून मगच अर्ज सादर करावा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati