वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला ; त्वरित जाणून घ्या !

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नर्सिंग सीईटी  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. या परिक्षे मध्ये चार विद्यार्थ्यांना १०० पसेंटाईल गुण मिळाले आहेत. या निकालाबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे आहे. जाणून घ्या

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Nursing CET Exam 2026 Result declared

बोएस्सी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षा  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा अंतर्गत  मे महिन्यात घेण्यात आली होती. आता नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे .   या सोईटी परीक्षेमध्ये चार विद्यार्थ्यांना १०० पसेंटाईल गुण मिळाले. यात तीन विद्यार्थिनी आणि  एक विद्यार्थी आहे. नर्सिंग सीईटी  प्रवेश परीक्षा निकाल संकेतस्थळा च्या  लॉगिनमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे . विद्यार्थी आपला निकाल तेथे जाऊन पाहू शकता.

आता या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. नर्सिंग सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक ६ व ७ मे रोजी दोन दिवसांत तीन सत्रात घेण्यात आली होती. या सीईटीला नोंदणी केलेल्या ४७ हजार ७२२ विद्याथ्यर्थ्यांपैकी ४३ हजार २८३ (९०.७० टक्के) विद्यार्थ्यांनी ११६ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. यामध्ये ११ हजार २८ विद्यार्थी व ३२ हजार २५५ विद्यार्थिनी होत्या. याला विद्याथ्यांची उपस्थिती होती.

ठाणे येथील सरिता विलास घोलप, नागपूर येथील ख्रिस्टिना आशिष जाकोब, चीड येथील शिवराज लक्ष्मण शेळके व ठाणे येथील सियोना शाजी वल्लूपारा या विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० पसेंटाइल गुण मिळवले आहेत.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

CBI Risk Management Officer Online Exam दिनांक जाहीर !

CBI RMO Exam 2026 - Central Bank of India has announced to conduct  Online Exam on date 14/6/2026 by IBPS for.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *