वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

१०वी आणि १२ वी च्या पुरवणी परीक्षेला सुरुवात झाली ! 10th and 12th-grade supplementary exams have Started

१०वी  आणि १२वी  स्टेट बोर्ड च्या पुरवणी परीक्षेला सुरवात झालेली आहे. 10th and 12th-grade supplementary exams have Started राज्य मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी जास्त आहे. दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेला मंगळवार १६ जून २०२६ पासून सुरवात झालेली आहे. अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.   

10th and 12th state board supplementry exam 2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जणारी  दहावी, बारावी पुरवणी परीक्षेला  १६ जून २०२६ पासून सुरूवात  झालेली आहे.   दोन सत्रा मध्ये पहिल्या दिवशी बारावी सह दहावीची परीक्षा घेण्यात आली आहे.  शिक्षण विभागात २० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी पुरवणी परीक्षा देत आहेत.

तसेच, महाराष्ट्र राज्य मंडळाच्यावतीने पुरवणी परीक्षांना सुरुवात झाली. यावर्षी पुरवणी परीक्षार्थीची संख्या जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी,हिंगोली असे पाच जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी ११ हजार ६०५ विद्यार्थी तर दहावीसाठी नऊ हजार ५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

उच्च माध्यमिक म्हणजे बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी विभागात ३२ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. आणि  माध्यमिक म्हणजे दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान आहे. दहावीसाठी ४१ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी बारावीचा इंग्रजी विषयाचा आणि दहावीचा मराठी भाषेचा पेपर  होता  तर यामध्ये एकूण  नऊ हजारपेक्षा अधिक परीक्षार्थी होते.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ब्रम्हपुरी वन्यजीव विभाग – रु. ६०,०००/- दरमहा वेतन ; १ पदासाठी अर्ज करा !

MahaForest Bramhapuri Job 2026 - Deputy Conservator of Forest, Bramhapuri Forest Division, Dist. Chandrapur invites.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *