There is good news for young people aspiring to a government job in the banking sector. A new recruitment notification has been published by the Bank of Baroda for 206 vacancies across various positions. Candidates can apply online for this recruitment drive. Interested candidates can submit their applications until August 26, 2026. Details regarding the post names, number of vacancies, application fees, educational qualifications, age limits, etc., are provided below. Please visit the official website for further information.
बँकेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदाच्या २०६ रक्त जागेच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. Bank of Baroda Bharti 2026 या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना २६ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करता येईल. पदांची नावे, रिक्त जागा, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. माहिती खालीलप्रमाणे आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन क्लिक करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मोठी भरती बँक ऑफ बडोदाने (बीओबी) डिजिटल बँकिंग, आयटी, डेटा सायन्स, अभियांत्रिकी, सुरक्षा आणि लेखा या संबंधित विविध विभागांमधील एकूण २०६ पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सरकारी बँकेतील नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत मॅनेजर, सिनियर मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, डेटा सायंटिस्ट, सिक्युरिटी मॅनेजर आणि इन्व्हेस्टर रिलेशन्स इ. पदांची भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पात्र व इच्छुक उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवरून २६ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात . अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, आयटी, वाणिज्य आणि इतर शाखांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. सीए (CA) आणि आयसीडब्ल्यूए (ICWA) यांसारखी व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठीही अनेक पदे उपलब्ध आहेत. या विविध पदांसाठी २ ते १० वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे.
विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार भिन्न आहेत. डिजिटल उत्पादने, माहिती सुरक्षा आणि डेटा सायन्सशी संबंधित पदांसाठी अनुभवासह बीई/बीटेक, एमसीए, एमएससी किंवा संबंधित पदवी आवश्यक आहे. सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल टेक्निकल ऑफिसर पदांसाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे, तर टॅक्सेशन आणि अकाउंट्स पदांसाठी सीए किंवा आयसीडब्ल्यूए आवश्यक आहे.
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ८५० रुपये असून, एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी ते १७५ रुपये आहे. पदनिहाय वयोमर्यादा २३ वर्षांपासून सुरू होऊन ४३ वर्षांपर्यंत आहे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळेल.
तसेच उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. मुदत संपण्यापूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योग्य पात्रता आणि अनुभव असलेल्या तरुणांसाठी ही बँक ऑफ बडोदातील नोकरीची मोठी संधी ठरू शकते.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
