A golden opportunity to work at SBI! This is a great chance for candidates aspiring to work in the banking sector. A recruitment notification has been released for a massive 9,766 Clerk posts at SBI. The deadline to apply for these positions is August 31, 2026. Applications must be submitted online via SBI’s official website, sbi.bank.in. For further details, please click the link provided below.
SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी ; ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी चांगली संधी ! SBI बँकेत तब्बल ९७६६ क्लर्क पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. SBI Bank 9766 clerk posts Bharti 2026 या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ ही आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने SBI बँकेच्या अधिकृत वेबसाईट sbi. bank.in वर जाऊन करावा. अधिक माहितीसाठी खालीदिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय स्टेट बँकेने (SBI) ज्युनियर असोसिएट या क्लर्क पदासाठी तब्बल ९ हजार ७६६ जागांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये ७ हजार ६८० नियमित आणि २ हजार ८६ बॅकलॉग पदे समाविष्ट आहेत. बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची अपेक्षा असणाऱ्या युवकांसाठी ही एक मोठी संधी ठरली आहे. सर्वसाधारण, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी अशा सर्व प्रवर्गातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कर्जयोजना
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना ११ ऑगस्टपासून अर्ज भरता येणार असून शेवटची तारीख ३१ ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळ sbi. bank.in वरून अर्ज स्वीकारले जातील. पात्र उमेदवारांनी वेळेवर अर्ज सादर करणे आवश्यक आहे, कारण विलंब झाल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रातील विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मात्र त्यांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पदवी प्राप्त करणे बंधनकारक राहील. वयाबाबत १ एप्रिल २०२६ रोजी किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे पूर्ण झालेले असावेत.
आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, एससी/एसटी उमेदवारांना पाच वर्षे तर दिव्यांग (पीडब्ल्यूबीडी), माजी सैनिक आणि इतर पात्र प्रवर्गांना सरकारी नियमांनुसार अतिरिक्त सूट मिळेल. ही भरती बँकिंग क्षेत्रात स्थिर करिअर घडवण्याची उत्तम संधी असल्याने पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून सविस्तर जाहिरात वाचून वेळेवर अर्ज करावा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati