वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at Indian Oil Corporation Limited (IOCL). This is a golden opportunity for young people. Interested and eligible candidates can apply for this recruitment until September 3, 2026. For further details, please visit the official website. Read on for comprehensive information.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत ४७० रिक्त जागेची विविध पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन क्लिक करू शकतात. सविस्तर माहिती जाणून घ्या.  

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

देशातील अग्रगण्य महारत्न कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने सन २०२६ साठी विविध विभागांतील कार्यकारी पदांवर एकूण ४७० पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या भरतीमुळे तरुण उमेदवारांना प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. कंपनीने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून संगणकाधारित परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली आहे. या पदांसाठी देण्यात येणारे पॅकेज सुमारे १८.४ लाख रुपये इतके आकर्षक असल्याने मोठ्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता आहे.

भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांना ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. निवड संगणकावर आधारित परीक्षेच्या माध्यमातून होईल. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण तपशील तपासून वेळेवर अर्ज करावा, कारण मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरतीत प्रामुख्याने ग्रेड ए अंतर्गत ग्रॅज्युएट इंजिनिअर पदे भरली जाणार आहेत. सिव्हिल ६२, केमिकल १६, इलेक्ट्रिकल ७५, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ३२, मेकॅनिकल ११८, इन्स्ट्रुमेंटेशन ३५ आणि कॉम्प्युटर सायन्स व आयटी २२ अशा एकूण ३७० जागा आहेत. संबंधित शाखेतील पूर्णवेळ बीई किंवा बीटेक पदवी किमान ६५ टक्के गुणांसह (एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडीसाठी ५५ टक्के) आवश्यक आहे.

ग्रेड ए अंतर्गत मार्केटिंग अधिकारी ४१ आणि लॉ अधिकारी १० जागा असून मार्केटिंगसाठी एमबीए किंवा पीजीडीएम आणि लॉसाठी एलएलबी पदवी किमान ६० टक्के गुणांसह आवश्यक आहे. लॉ पदासाठी दोन वर्षांचा अनुभवही मागितला आहे. ग्रेड ए० अंतर्गत असिस्टंट क्वालिटी कंट्रोल अधिकारी ९ जागा आहेत, ज्यासाठी केमिस्ट्री विषयातील एमएससी आणि दोन वर्षांचा प्रयोगशाळा अनुभव आवश्यक आहे.

ग्रेड ई० अंतर्गत डिप्लोमा इंजिनिअर व सुरक्षा अधिकारी ५० जागा भरल्या जातील. इलेक्ट्रिकल १४, मेकॅनिकल २१ आणि सेफ्टी १५ जागा असून तीन वर्षांचा डिप्लोमा किमान ६५ टक्के गुणांसह हवा. सेफ्टीसाठी अतिरिक्त इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमाही आवश्यक. जुलै २०२६ रोजी वय निश्चित होईल. जनरल व ईडब्ल्यूएससाठी इंजिनिअर २६, मार्केटिंग २८ तर लॉ व क्वालिटीसाठी ३० वर्षे मर्यादा आहे. ओबीसीला तीन व एससी/एसटीला पाच वर्षांची सवलत मिळेल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

परीक्षा व मुलाखत न घेता मुंबई महानगरपालिकेत थेट ६१२ रिक्त जागेची भरती ! Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

A new employment opportunity has opened up for young men and women at the Mumbai …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *