वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदांची परीक्षा आता २८ जुलै ऐवजी २ ऑगस्ट २०२६ ला होणार ! Adivasi vibhag bharti 2026

The examination for the recruitment of Watchmen under the Tribal Development Department’s Chandrapur Project was originally scheduled for July 29, 2026, but will now be held on August 2, 2026. This recruitment exam for Watchmen posts in the Tribal Development Department has been postponed for the second time. Find out more details regarding this.

आदिवासी विकास विभाग चंद्रपूर प्रकल्प अंतर्गत चौकीदार पदांची भरती साठी घेतली जाणारी परीक्षा २९ जुलै २०२६ रोजी होणार होती पण आता ती परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. Adivasi vibhag bharti 2026 आदिवासी विकास विभाग चौकीदार पदांची भरती परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. यासंबधीची अधिक माहिती जाणून घ्या.   

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Aadivasi Vibhag Bharti 2026

नवीन माहिती समोर आलेली आहे ,  एकीकडे पेपरफुटीचे सत्र आणि ढिसाळ परीक्षा पद्धतीविरोधात देशभरातील ‘जेन झी’ने दिल्लीतील जंतरमंतरवर उतरून केलेल्या आंदोलनाची शाई वाळते ना वाळते, तोच आदिवासी विकास विभागांतर्गत होणारी चौकीदार पदाची सरळसेवा भरती परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून, परीक्षार्थीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आदिवासी विकास आयुक्त, नाशिक यांच्या अधिपत्याखालील शासकीय आश्रमशाळा वसतिगृहांमधील गट-ड संवर्गातील चौकीदार पदाच्या तब्बल ४७८ रिक्त जागांसाठी २९ एप्रिल २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र, जाहिरातीपासूनच या परीक्षेला
चंद्रपूरच्या मुलांना दिले होते बीडचे सेंटरा अनेक उमेदवारांनी परीक्षा केंद्राचा पसंतीक्रम देताना चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर हे पर्याय निवडले होते; तरीही त्यांना बीडसारखी दूरवरची परीक्षा केंद्र देण्यात आले.

वेळापत्रकाचे ग्रहण लागले आहे. ही परीक्षा सर्वात आधी ११ ते १६ जुलैदरम्यान आयोजित करण्यात येणार होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा त्याच कालावधीत असल्याचे कारण पुढे करत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि २८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे निश्चित झाले. असे असताना, आता परीक्षेच्या ऐन आदल्या दिवशी चंद्रपूर प्रकल्पासाठी २८ जुलै रोजी होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलून ती २ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार परीक्षेत बदला: आदिवासी विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, परीक्षा केंद्र बदलाच्या विनंत्या व निवेदनांचा विचार करून चंद्रपूर प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. २८ जुलै रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये होणारी परीक्षा आता २ ऑगस्ट रोजी पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर प्रकल्पातील उमेदवारांनी आपले सुधारित प्रवेशपत्र पोर्टलवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Teacher Bharti 2026

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ! पदवीधर वेतनश्रेणी पुन्हा थांबली ; शिक्षकांना धाकधूक ! Teacher Bharti 2026

A significant development has occurred regarding the issue of granting the graduate pay scale to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *