वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर ! नागपूर विद्यापीठ मध्ये १३९ सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरु ! Nagpur University Bharti 2026

A great opportunity to get a government job has come. A new advertisement for the recruitment of a total of 139 vacancies for the posts of Assistant Professor under Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University has been published recently. Nagpur University Bharti 2026 Interested and eligible candidates can apply along with the required documents by 10th August 2026. For more information, you can visit the official website of Nagpur University. Know more information about the recruitment.

सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांसाठी एकूण १३९ रिक्त जागेच्या भरतीची नवीन जाहिरात नुकतीच प्रकाशित झालेली आहे. Nagpur University Bharti 2026 आवश्यक कागदपत्र सोबत इच्छुक आणि पात्र उमेदवार १० ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Nagpur University Bharti 2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या या भरती प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांना शैक्षणिक क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.  उमेदवारांनी त्वरित अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन विद्यापीठाने उमेदवारांना केले आहे.

नागपूर विद्यापीठाने (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Bharti 2026) शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. नागपूर  विद्यापीठाने विविध शैक्षणिक विभागांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी (Post of Assistant Professor) एकूण १३९ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी rtmnuoarec.samarth.edu.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे. ठरलेल्या मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे नागपूर  विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कठोरपणे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराकडे संबंधित विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच बी.ई./बी.टेक., एम.ई./एम.टेक. किंवा बी.फार्म. पदवीधर उमेदवारही अर्ज करू शकतात. याशिवाय नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण किंवा पीएच.डी. पदवी धारण करणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा १० ऑगस्ट २०२६ रोजी ५९ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी लागू असेल. निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर येथेच सेवा द्यावी लागणार आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या भरतीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवा प्राध्यापकांना आणि संशोधकांना चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या या भरती प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांना शैक्षणिक क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरित अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य पद्धतीने राबवली जाईल, अशी विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MPSC Talathi Bharti 2026

आनंदाची बातमी ! MPSC तलाठी भरती एकूण १५३९ रिक्त जागा त्वरित जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप ! Talathi Bharti 2026 for 1539 Posts !

Great news! The MPSC (Maharashtra Public Service Commission) has initiated the recruitment process for the …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *