वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बँकेत मोठी भरती ! युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ३९५ पदांची भरती ! Union Bank of India Bharti 2026

A golden opportunity for young people aspiring to work in the banking sector! Recruitment for 395 positions has commenced at Union Bank of India. Hiring is underway for roles such as Specialist Officer, General Banking Officer, and Domain Expert Officer. The online application process began on July 21, 2026, and eligible, interested candidates can apply until August 10, 2026. Click the link below for more information.

युनियन बँक ऑफ (Union Bank of India) इंडियाने ‘भरती प्रकल्प २०२६-२७’ अंतर्गत ३९५ पदांसाठी भरती ( Recruitment for 395 posts) जाहीर केली आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर, जनरल बँकिंग ऑफिसर (General Banking Officer) आणि डोमेन एक्सपर्ट ऑफिसर (Domain Expert Officer) यासह विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ जुलैपासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार १० ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती कायमस्वरूपी आधारावर होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांची देशभरात कोठेही पोस्टिंग होईल.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Union Bank of India Bharti 2026

पद आणि रिक्त जागा

या भरतीअंतर्गत मॅनेजर (१६३), सीनियर मॅनेजर (१५३), चीफ मॅनेजर (५२), असिस्टंट जनरल मॅनेजर (२०) आणि डेप्युटी जनरल मॅनेजर (७) अशा विविध स्तरावरील पदांचा समावेश आहे. उमेदवारांना पदानुसार वेगवेगळी जबाबदारी आणि वेतनमान मिळणार आहे.

अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना १,१८० रुपये तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना १७७ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. बहुतांश पदांसाठी कमाल वयोमर्यादा ३० ते ५० वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

निवड ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारावर होईल. परीक्षेत रीझनिंग, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅपिट्यूड, इंग्रजी आणि प्रोफेशनल नॉलेज या विषयांचा समावेश असेल. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांची नेगेटिव्ह मार्किंग लागू राहील.

वेतन आणि सुविधा

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पॅकेज मिळेल. मॅनेजर स्तरावर सुरुवातीचे वार्षिक सीटीसी सुमारे २१ लाखांपासून सुरू होऊन डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी ४७ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. याशिवत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा आदी भत्ते मिळतील. निवडीनंतर २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी आणि ३ वर्षांचा सर्व्हिस बाँड लागू राहील.बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BOB PMO Professional – पदवीधर ; ५ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BOB PMO Recruitment 2026 - Bank Of Baroda invites Online applications in prescribed format till last date 31/7/2026 for.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *