A great opportunity for students! There is good news for students wishing to enroll in the first-year engineering course this year, as 216,000 seats are available for engineering degree programs. Engineering Admission 2026 Details regarding the number of seats available for each engineering course are provided below; please read on for more information.
विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी ! यावर्षी ज्या मुला,मुलींना अभियांत्रिकी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Engineering Admission 2026 कारण यावर्षी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या २ लाख १६ हजार जागा उपलब्ध आहे. प्रत्येक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या किती जागा उपलब्ध आहेत. ते खालीलप्रमाणे दिलेले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी या वर्षी तब्बल दोन लाख १६ हजार ५५२ जागा उपलब्ध आहेत. तसेच या वर्षी संगणक अभियांत्रिकीसाठी सर्वाधिक ३० हजार ९९३ जागा आहेत. त्याखालोखाल मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या अभ्यासक्रमांना सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यात विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीसाठी गुरुवारपर्यंत स्वतःच्या लॉगिनमधून पसंतीक्रम ऑनलाइन भरता येणार आहे. राज्यात ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
दोन जुलैपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आणि १९ जुलैला अंतिम मुदत संपली. यावर्षी प्रवेशासाठी दोन लाख ४४ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेची तात्पुरती गुणवत्ता यादी २२ जुलैला, तर अंतिम गुणवत्ता यादी २७ जुलैला जाहीर करण्यात आली.
पहिल्या फेरीची जागावाटपाची यादी येत्या रविवारी जाहीर होणार आहे. तर, प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना तीन ते पाच ऑगस्टदरम्यान जागा स्वीकारून नेमून दिलेल्या संस्थेत उपस्थित राहून कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati