वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IBPS द्वारे ११४०३ कलर्क पदांची मोठी भरती ; बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी ! IBPS Bharti 2026

A golden opportunity has arisen for young people aspiring to work in the banking sector. A major recruitment drive for 11,403 Clerk vacancies has been launched by the Institute of Banking Personnel Selection (IBPS). This is a massive recruitment drive. Candidates can apply online by visiting the official website, www.ibps.in. Interested and eligible candidates can submit their applications from August 1, 2026, to August 21, 2026. Further details are provided below.

ज्या तरुणांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे .  IBPS इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत  क्लर्क पदासाठी ११४०३ रिक्त जागेची मोठी  भरती सुरु झालेली आहे. IBPS Bharti 2026 ही सर्वात मोठी मेगा भरती जाहीर केलेली आहे. या भरती साठी उमेदवार ऑनलाईन अर्ज www.ibps.in या  अधिकृत वेबसाइट वर जाऊन करू शकतात.  इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज १ ऑगस्ट २०२६ पासून २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत करू शकतात. अधिक माहिती खालील प्रमाणे आहे. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 

IBPS Bharti 2026

 

 

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (BIPS) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कस्टमर सर्व्हिस असो सिएट (क्लर्क) पदांसाठी मोठी भरती  प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 11 हजार 403 रिक्त जागांसाठी ही मेगाभरती सुरू झाली असून, बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो तरुणांना ही सुवर्णसंधी मानली जात आहे. इच्छुक उमेदवार आज 1 ऑगस्ट 2026 पासून अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे.

उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. आयबीपीएस क्लर्क भरती ३०२६ अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना विविध सार्वजनिक बँकांमध्ये स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राहणार असून, प्रीलिम्स, मेन्स आणि दस्तऐवज पडताळणी अशा टप्प्यांत निवड होईल.

उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय संगणक साक्षरता अनिवार्य आहे. उमेदवाराने संगणक विषयात प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी घेतलेली असावी किंवा हायस्कूल/कॉलेज स्तरावर संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान हा विषय असावा. वयाची किमान मर्यादा 20 वर्षे आणि कमाल मर्यादा 28 वर्षे आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क ८५० रूपये आहे, तर SC, ST आणि PwD उमेदवारांना फक्त १७५ रुपये शुल्क लागू आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. बँकिंग क्षेत्रात सुरक्षित आणि चांगल्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही आयबीपीएस क्लर्क भरती खरोखरच एक मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट नियमित तपासून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank Bharti 2026

खुशखबर !! SBI बँकेत १ हजार ५३८ लिपिक पदांची भरती ,नवीन जाहिरात प्रकाशित; लगेच अर्ज करा ! SBI Bank Bharti 2026 1538 Posts

Here is some good news for candidates aspiring to work in the banking sector. An …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *