वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ! पदवीधर वेतनश्रेणी पुन्हा थांबली ; शिक्षकांना धाकधूक ! Teacher Bharti 2026

A significant development has occurred regarding the issue of granting the graduate pay scale to subject teachers appointed for classes 6 to 8. After the Nagpur Bench of the Bombay High Court ordered that all eligible subject teachers be granted the graduate pay scale along with arrears, the Maharashtra government has decided to challenge this ruling in the Supreme Court.

मुंबई उच्च न्यायालयाचा शिक्षकांचा  मोठा निर्णय इयत्ता सहावी ते आठवीसाठी नियुक्त विषय शिक्षकांना  पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व पात्र विषय शिक्षकांना  थकबाकीसह पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यासाठी अधिकृत पत्र जारी केले असून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांची धाकधूक  वाढली आहे.

Teacher Bharti 2026

शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ८ मे २०२६ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असून नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना सर्व अभिलेख, कागदपत्रे आणि आवश्यक माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने १३ ऑक्टोबर २०१६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इयत्ता सहावी ते आठवीसाठी विज्ञान-गणित, भाषा आणि समाजशास्त्र या विषयांसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या नियुक्त्यांमध्ये केवळ ३३ टक्के पदांनाच पदवीधर वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली. उर्वरित शिक्षकांना समान काम करूनही पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ नाकारण्यात आल्याने राज्यभरात नाराजी निर्माण झाली होती.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *