वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ISRO मध्ये ३३६ रिक्त पदांची भरती सुरु ; पदवीधरांसाठी नोकरीची संधी ! ISRO Bharti 2026

There is a golden opportunity and great news regarding government jobs for graduate youths. A new recruitment notification has been published for a total of 336 vacancies across various positions under ISRO. Interested and eligible candidates should apply online by visiting ISRO’s official website. The deadline for submitting applications is August 16, 2026. Candidates are advised to carefully read the provided information before submitting their applications. Please check for detailed information.

पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तसेच एक मोठी आनंदाची बातमी आहे. ISRO अंतर्गत विविध पदांची ऐकूण ३३६ रिक्त जागेच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे.  ISRO Bharti 2026इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  इस्रो च्या अधिकृत वेबसाईट जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२६ ही आहे. अर्ज सादर करताना दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी मग अर्ज सादर करावा. सविस्तर माहिती जाणून घ्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ISRO Recruitment 2026

नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) . इस्रोने ISRO विविध पदांसाठी एकूण ३३६ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीमुळे पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीचीउत्तम संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात . अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०२६ ही आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रसिद्ध जाहिरातीनुसार या भरतीअंतर्गत असिस्टंट पदासाठी ११३ जागा, ज्युनियर पर्सनल असिस्टंटसाठी ८१ जागा, उच्च श्रेणी लिपिक पदाच्या २२ जागा आणि स्टेनोग्राफर पदासाठी १० जागा आहेत. याशिवाय स्वायत्त संस्थांमध्ये असिस्टंटसाठी १७ आणि ज्युनियर पर्सनल असिस्टंटसाठी १ जागा समाविष्ट आहे. या सर्व पदांवर पात्र उमेदवारांची निवड होणार आहे. इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतता याप्रमाणे आहे . असिस्टंट आणि उच्च श्रेणी लिपिक पदांसाठी किमान ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच संगणक वापराचे ज्ञान आवश्यक आहे. ज्युनियर पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी ६० टक्के गुणांसह पदवी किंवा कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील ६० टक्के गुणांसह डिप्लोमा, स्टेनो-टायपिस्ट किंवा स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव, इंग्रजी स्टेनोग्राफीचा ६० शब्द प्रति मिनिट वेग आणि संगणक ज्ञान अटी आहेत. वरील पदांसाठी वयोमर्यादा ही १६ ऑगस्ट २०२६ रोजी १८ ते २८ वर्षे असावी. सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत मिळेल.

पदांच्या भरतीसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. पात्रता, अनुभव आणि इतर अटी पूर्ण करणाऱ्यांनीच अर्ज करावा. या मेगा भरतीमुळे अनेक पदवीधरांना इस्रोसारख्या अग्रगण्य संस्थेत करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Teacher Bharti 2026

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ! पदवीधर वेतनश्रेणी पुन्हा थांबली ; शिक्षकांना धाकधूक ! Teacher Bharti 2026

A significant development has occurred regarding the issue of granting the graduate pay scale to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *