A golden opportunity for government jobs for young men and women! A new advertisement has been published for a mega recruitment drive for Junior Engineer and related posts under the Railway Recruitment Board (RRB). This recruitment drive covers a total of 4,098 vacancies. The application process for these 4,098 Junior Engineer posts is set to begin in August. For further details, please visit the official website of the Railway Board.
युवक युवतींसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर व संबंधित पदांसाठी मेगा भरती ची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. एकूण ४०९८ जागेसाठी ही मेगा भरती होणार आहे. Railway 4098 Junior Engineer Posts Bharti 2026 या भरती संदर्भात अर्ज प्रक्रिया ऑगस्ट महिन्या पासून सुरु होणार आहे. अधिक माहिती साठी रेल्वे बोर्ड च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नोकरीची सुवर्ण संधी ; भारतीय रेल्वेने इंजिनिअरिंग पदवी (Railway Engineering Degree) आणि डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी ही फार मोठी संधी जाहीर केली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर व संबंधित पदांसाठी एकूण ४ हजार ९८ जागांची मेगा भरती (Mega recruitment for a total of 4 thousand 98 posts) सुरू होणार आहे . तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, ही भरती प्रक्रिया देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये राबवली जाणार आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची (Government job in engineering field) इच्छा असणाऱ्या हजारो तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे या भरतीअंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, डिझाइन, वर्कशॉप्स) सारख्या विविध टेक्निकल शाखा, डेपो मटेरियल सुपरिंटेंडेंट (DMS) आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) पदांची भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा, बी.ई./बी.टेक किंवा सायन्स शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, फक्त पात्र उमेदवारांनाच अर्ज करण्याची संधी मिळणार असून, परीक्षा व निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल.
या भरती साठी उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे ठेवण्यात आली आहे. वयाची गणना १ जानेवारी २०२७ रोजीच्या आधारावर केली जाईल. राखीव वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोसूट मिळेल. अर्ज प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी आधार कार्ड अपडेट ठेवणे, आधारवरील नाव व जन्मतारीख दहावीच्या गुणपत्रिकेशी जुळवणे तसेच फोटो व बायोमेट्रिक माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
तसेच महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या
अधिसूचना: २१ जुलै २०२६
सविस्तर अधिसूचना: १३ ऑगस्ट २०२६
ऑनलाइन अर्ज सुरू: १४ ऑगस्ट २०२६
अर्ज अंतिम तारीख: १३ सप्टेंबर २०२६
उमेदवारांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर नियमित माहिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही मेगा भरती रेल्वे क्षेत्रात स्थिर करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी वेळेचा सदुपयोग करून परीक्षेची तयारी सुरू करावी आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत, जेणेकरून अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati