वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरकारी नोकरीची संधी ! सुप्रीम कोर्टामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु !

सरकारी नोकरीची उत्तम संधी ; तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ऑनलाईन अर्ज २३ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही २३ फेब्रुवारीपासून अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२६ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.sci.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. पदांची संख्या , अर्ज कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Supreme court Recruitment 2026

कोणत्या पदांसाठी भरती?
सहाय्यक संपादक – ५ पदे
सहाय्यक ग्रंथपाल – १४ पदे
वरिष्ठ न्यायालय सहाय्यक (संग्रहालय) – २ पदे
सहाय्यक संचालक – १ पद
एकूण २२ पदे भरली जातील.

महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीखः २३ फेब्रुवारी २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीखः ८ मार्च २०२६
अर्ज कसा करावा?
सुप्रीम कोर्टच्या अधिकृत वेबसाइट wwww.sci.gov.in ला भेट द्या

अर्ज कसा करावा?
सुप्रीम कोर्टच्या अधिकृत वेबसाइट www.sci.gov.in ला भेट द्या Recruitment सेक्शनमध्ये इच्छित पदासाठी अर्ज फॉर्म उघडा आणि सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
सबमिट करण्यापूर्वी फॉर्म नीट तपासा

पदानुसार पगार
सहाय्यक संपादकः वेतन स्तर १२, मूळ वेतन ७८,८०० सहाय्यक संचालक (सर्वोच्च न्यायालय संग्रहालय): वेतन स्तर ११, मूळ वेतन ६७,७०० वरिष्ठ न्यायालय सहाय्यक (संग्रहालय): वेतन स्तर ८, मूळ वेतन ४७,६००

सहाय्यक ग्रंथपालः वेतन स्तर ८, मूळ वेतन ४७,६००

पात्रता : 
सहाय्यक संपादक – बार कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त एलएलबी पदवी आणि किमान ३ वर्षांचा
अनुभव आवश्यक आहे.

सहाय्यक संचालक – संग्रहालयशास्त्रात प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षांचा संशोधन अनुभव अनिवार्य आहे.

वरिष्ठ न्यायालय सहाय्यक (संग्रहालय) – ५५% गुणांसह संग्रहालयशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव.

सहाय्यक ग्रंथपाल – ग्रंथालय विज्ञानात पदवी, संगणक डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव आवश्यक

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *