वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

लवकरच ठाणे अग्नीशमन दलात ६०१ पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार ! Thane Fire Brigade Bharti 2026

Thane Fire Brigade Bharti 2026 : A recruitment drive for the Thane Fire Brigade will soon commence, following approval from the state government. Commissioner Saurabh Rao has announced this recruitment process, which involves filling 601 positions. The recruitment will be conducted through the company TCS. This is a great opportunity for young people; read on for detailed information.

लवकरच राज्य सरकारच्या मान्यतेनुसार ठाणे अग्निशमन दलात भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. Thane Fire Brigade Bharti 2026   अशी घोषणा आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. अग्निशमन दलात ६०१  पदांची भरती सुरु होणार आहे. ही भरती प्रक्रिया ‘टीसीएस’ कंपनी अंतर्गत होणार आहे. ही तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ठाणे अग्निशमन दलात भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. गावदेवी मंडईतील आगीनंतर अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेत आयुक्त सौरभ राव मंगळवारी झालेल्या  यांनी अग्निशमन दल आणि अभियांत्रिकी विभागातील भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याची घोषणा केली आहे . या भरती  प्रक्रियेला प्राधान्य देत पुढील दोन दिवसांत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे सौरभ राव यांनी नमूद केले. अग्निशमन विभागातील रिक्त पदे  लवकरच या माध्यमातून भरण्यात येणार आहे.

तसेच ,शहरातील आगीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या सूचनेनुसार भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या मान्यतेनुसार
‘टीसीएस’ कंपनी या  भरती प्रक्रियेत महापालिका प्रशासनाला मदत करणार आहे.

आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले की ,काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती, असे जुन्या जाहिरातीनुसारच भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात ‘टीसीएस’च्या पथकाशी चर्चा झाली असून लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. येणाऱ्या  तीन महिन्यांत ही भरती पूर्ण होईल, असा विश्वास राव यांनी  व्यक्त केला.

अग्निशमन दलातील  अधिकारी गिरीश झळके यांनी आग लागण्याची घटना, तिची तीव्रता, तसेच आग नियंत्रणात आणण्यासाठी लागलेला वेळ याबाबतची माहिती सभागृहासमोर मांडली. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले की, अग्निशमन विभागात ८३५ पदे मंजूर असताना केवळ ३२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ही तफावत दूर करण्यासाठी ६०१ पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तरुणानं साठी  सरकारी नोकरीची चांगली संधी आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank Bharti 2026

खुशखबर !! SBI बँकेत १ हजार ५३८ लिपिक पदांची भरती ,नवीन जाहिरात प्रकाशित; लगेच अर्ज करा ! SBI Bank Bharti 2026 1538 Posts

Here is some good news for candidates aspiring to work in the banking sector. An …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *