वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी ! महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या २९९२ रिक्त जागेसाठी भरती सुरु ! संपूर्ण माहिती जाणून घ्या – Revenue Servant (Kotwal) Bharti 2026

A total of 2,992 vacancies for the post of Revenue Servant (Kotwal) under the Revenue Department of Maharashtra state are set to be filled. The recruitment process for these posts will be completed before November 30. Eligible and interested candidates should check the detailed information

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभाग अंतर्गत महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या एकूण २९९२ रिक्त जागेची भरती होणार आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया ३० नोव्हेंबर पूर्वी पूर्ण होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती जाणून घ्या. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Mahsul sevak Bharti 2026

राज्यातील महसूल विभागात रिक्त असलेल्या महसूल सेवक अर्थात कोतवाल पदांच्या भरतीला शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. ३० एप्रिल २०२६ रोजी रिक्त असलेल्या एकूण दोन हजार नऊशे ब्याण्णव पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश महसूल व वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. महसूल व वन विभागाच्या कार्यासन अधिकारी सुजाता माणसार यांनी यासंदर्भातील पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार महसूल सेवक (कोतवाल) भरतीसाठी जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार तसेच शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून ही पदे भरण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता निवड समितीने घ्यावी, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील महसूल सेवकांची दोन हजार नऊशे ब्याण्णव पदे रिक्त असल्याने संबंधित पदे भरण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर निवड समित्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. सदरची पदभरती प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाईल, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.

त्यामुळे आगामी काळात जिल्हानिहाय महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. ग्रामीण स्तरावरील महसूल व्यवस्थापन, गावपातळीवरील कामकाज आणि प्रशासकीय सेवा अधिक प्रभावी होण्यास या भरतीमुळे मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या निर्देशांचे पालन करून नियोजित कालावधीत प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *