वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बारामती नगरपरिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु ; थेट मुलाखतीतून निवड ! जाणून घ्या सविस्तर

बारामती नगरपरिषद शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शिक्षक (पुरुष/महिला), दाई (महिला) आणि कला शिक्षक (पुरुष/महिला) अशा एकूण 26 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती मानधन तत्त्वावर 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार असून, उमेदवारांची नेमणूक बारामती नगरपरिषद शाळा क्र. 1 ते 8 मध्ये LKG, HKG आणि इयत्ता 1 ली ते 8 वी साठी केली जाईल.

Baramati Nagarparishad Bharti 2025

मुलाखतीचा तपशील:

तारीख: सोमवार, 9 जून 2025

वेळ: सकाळी 11:00 वाजता

स्थळ: शारदा प्रांगण, बारामती नगरपरिषद शाळा क्र. 7, बारामती

निवड प्रक्रिया: मुलाखत

एकूण रिक्त पदे: 26

पदानुसार शैक्षणिक पात्रता: शिक्षक (महिला): मॉन्टेसरी कोर्स / प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण कोर्स किंवा HSC आणि D.Ed उत्तीर्ण असणे आवश्यक.

दाई (महिला): किमान 7 वी पास असणे आवश्यक.

कला शिक्षक (पुरुष/महिला): A.T.D. (Art Teacher Diploma) आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बायोडाटा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह व झेरॉक्स प्रतींसह वरील दिलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती प्रक्रिया बारामती नगरपरिषद, पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी बारामती नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *